20 जानेवारीला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नरखेड पोलीस स्टेशन येथे 55 आरोपींची परेड घेण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली. यामध्ये पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्ता विरुद्ध चे गुन्हे करणारे व इतर गुन्हेगारांना बोलविण्यात आले होते व त्यांना सक्त ताकीद देण्यात आली.