सेलू: तालुक्यातील राशन दुकानदारांची दिवाळी अंधारात! चार महिन्यांपासून कमिशन थकले
Seloo, Wardha | Oct 18, 2025 तालुक्यातील सर्व राशन दुकानदारांना गेल्या चार महिन्यांपासून (जुलै 2025 पासून) कमिशन मिळालेले नाही. यामुळे दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दिवाळी येऊन ठेपली असताना त्यांचा सण अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुकानंदारांचे कमिशन त्वरित अदा करावे अशी मागणी राशन दुकानदार संघटना, सेलू यांच्या वतीने ता. 18 शनीवारला दुपारी 2.30 वाजता तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे.