धुळेतील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली. जय मल्हार नगर येथील ही मुलगी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी घरातून बेपत्ता झाली असून, अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून तिला पळवून नेल्याचा संशय आहे. शोध घेतल्यावरही ती न सापडल्याने वडिलांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, मुलगी व आरोपीचा शोध घेतला जात आहे.