पालांदूर परिसरात गॅस सिलिंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे सामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. वितरणाची वाहने दोन-दोन दिवसांच्या अंतराने येत असल्याने सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना सकाळपासून थांबून राहावे लागत आहे, मात्र अनेकजण रिकाम्या हाताने परत जात असल्याचे चित्र आहे. अनेक लोकांनी सकाळी लवकर येऊनही त्यांना सिलिंडर मिळाला नाही. त्यामुळे लोकांना स्वयंपाक करण्यासाठी अडचणी येत असून, या तुटवड्यामुळे अनेकांना उपाशी राहावे लागण्याची वेळ आली आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.