उमरेड येथील तहसील कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विविध शालेय स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून सन्मानित करण्यात आले.सकाळी तहसीलदारांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.