अंजनगाव दर्यापूर मार्गावरील हंतोडा फाट्यावर आज दुपारी ४ वाजता एका टिप्परची दुचाकीला जोरदार धडक लागली या धडकेत दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाला असून त्याला ग्रामीण रुग्णालय अंजनगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अकोला येथील युवक हा त्याच्या दुचाकी क्र. एम एच ३० बीएक्स ५१७६ ने दर्यापूर रोडने जात असताना अज्ञात टिप्परने युवकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाला. जखमी युवकाचे नाव कळले नसून तो युवक अकोला येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.