राहुरी फॅक्टरी येथील चौकातून सुरू असलेले मुरूम व खडी वाहतूक करणारे डंपर यामुळे तेथील नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे ही जड वाहतूक राहुरी फॅक्टरी येथील चौकातून न करता इतरत्र मार्गाने वळवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढुस यांनी केली आहे. त्यांनी आज मंगळवारी दुपारी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी करत निवेदन दिले आहे.