अमळनेर: धार रस्त्यावर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत कुजलेला मृतदेह आढळला; अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
अमळनेर येथील धार रस्त्यावर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक इसमाचे कुजलेले प्रेत आढळून आल्याचा प्रकार सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आले आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.