नायगाव-खैरगाव: कृष्णुर औद्योगिक वसाहत परिसरात बिबट्याने एका व्यक्तीवर केला हल्ला, जखमीचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल
दुपारी 3 ते 3:30 च्या दरम्यान नांदेड नरसी जाणाऱ्या रोडवर असणाऱ्या कृष्णुर औद्योगिक वसाहत परिसरामध्ये बिबट्याने एका तरुणावर हल्ला केल्या असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चे नाव श्रीकांत पोपुलवाड वय वर्ष 30 असे आहे, त्याचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल होत असून सदर घटनेची माहिती पोलीस प्रशासनासह वन विभागाला देखील देण्यात आलाय असून वन विभाग सदर परिसरात गेले आहेत.