पुणे शहर: पाषाण येथे पोलीस स्मृतिदिन कार्यक्रम, शहीद पोलिसांना पुष्पचक्र अर्पण
Pune City, Pune | Oct 21, 2025 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पाषाण येथे आयोजित पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमाला उपस्थित राहून शहीद पोलिसांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.या वेळी त्यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत समाजाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी दिलेल्या त्यागाची आठवण करून दिली. कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलिस दलातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.