चंद्रपूर: 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
दिनांक 15 व 16 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याकरीता चंद्रपूर व इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी होत असतात. त्यामुळे चंद्रपूर शहरात मोठया संख्येने वाहन येणे, वाहतुकीची कोंडी होणे, वाहतुक व रहदारी सुरळीत सुरू राहावी तसेच कोणतेही अनुचित घटना / दुर्घटना घडू नये म्हणून 16 ऑक्टो रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त चंद्रपूर शहरातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क