ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत ग्राम आसोली येथे आरोपी केसरा मौजे वय 65 वर्षे यांच्या घरावर धाड टाकून पोलिसांनी छपरीत मातीच्या मडक्यातील दोन हजार रुपये किमतीची मोहफुलाची दहा लिटर दारू जप्त केली. दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी रविवारला ही कारवाई करण्यात आली. आरोपीवर कलम 65( ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.