भोकर: भोकर नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने नगर अध्यक्ष पदासह दहा नगरसेवकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले
Bhokar, Nanded | Nov 17, 2025 आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान भोकर येथे भोकर नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने आपले उमेदवार दिले आहेत. नगराध्यक्ष पदासह दहा नगरासेवकांनी आपला उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवशी दखल केला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सुभाष पाटील किन्हाळकर यांनी उमेदवारी दखल केली. उमेदवारी दाखल करताना आमदार आनंद पाटील बोंढारकर, जिल्हाप्रमुख विनय गिरडे पाटील यांची उपास्थिती होती. भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने आपले उमेदवार उभे केल्याने रंगत वाढणार आहे