अक्कलकोट: अक्कलकोट- वागदरी रस्ता बंद : शिरसी पुलावर ३ ते ४ फूट पाणी...
अक्कलकोट तालुक्यातील मौजे शिरसी येथील पुलावरून ३ ते ४ फूट पाणी वाहत असल्याने अक्कलकोट ते वागदरी हा प्रमुख रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने पाणी ओसरण्यास वेळ लागू शकतो. सुरक्षिततेसाठी पुलावरून कोणतीही हालचाल टाळण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.