घरकाम करत असताना एका महिलेला छातीत दुखायला लागले. श्वास घ्यायला त्रास जाणवल्यानंतर त्यांना नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील रुग्णालयात नेण्यात आले. अखेर नागपूरला आणले मात्र हृदयाचे ठोके ऐकू येत नसल्याने डॉक्टरांनी आशा सोडली. पण नाडी हाताला लागल्याने विश्वास वाढला. रुग्ण जिवंत असल्याची खात्री पटली. डॉक्टरने तपासणी केली असता या रुग्णाचे हृदय डाव्या बाजूला नव्हे तर उजव्या बाजूला असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आणि त्यांना धक्काच बसला.