जनसेवेचे व्रत अंगीकारलेले, सर्वसामान्यांचे कैवारी आणि प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पनवेल येथील संग्राम निवासस्थानी भेट देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण अभिवादन केले. लोकनेते दि. बा. पाटील साहेब हे केवळ एक राजकीय नेता नव्हते, तर ते प्रकल्पग्रस्तांचे आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर झटणारे समाजसेवक होते. त्यांचे समाजकारण, नेतृत्वशैली आणि कार्यपद्धती आजही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.