आमगाव: करंजा-आमगाव मार्गावर भीषण अपघात, बापडी येथील शिक्षकाचा जागीच मृत्यू
Amgaon, Gondia | Oct 5, 2025 दुपारच्या सुमारास करंजा-आमगाव मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात बापडी येथील रहिवासी लिंकेश नागपुरे (व्यवसाय - शिक्षक) हे दुर्दैवाने ठार झाले असून दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघात एवढा जबरदस्त होता की दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र