लाखनी: लाखनी येथे अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई : ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
लाखनी पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई करत ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता गायधने मोहल्ला, लाखनी येथे करण्यात आली. रजत भालचंद्र चांदेवार (वय २२ वर्ष, रा. वार्ड क्र. १७, तलाव मोहल्ला, लाखनी, जि. गोंदिया) याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जॉन डिअर कंपनीचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर (क्र. MH-36 AR-1799) आणि निळ्या रंगाची ट्रॉली (क्र. MH-36 Z-4457) यांच्या सहाय्याने अवैधरीत्या रेतीची वाहतूक केली.