धुळे तालुक्यातील जुने भदाणे शिवारात आग लागून तीन आदिवासी कुटुंबांच्या झोपड्या जळून खाक झाल्या. संतोष पवार, भगवान पवार व कडू पवार यांच्या घरातील धान्य, कपडे, रोकड व कागदपत्रे भस्मसात झाली. प्रत्येकी सुमारे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सर्वस्व गमावल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नेर पोलिस, तलाठी व कोतवालांनी पंचनामा केला असून तातडीने मदतीची मागणी करण्यात येत आहे.