पाथ्री: पाटोदा येथे गरोदर महिलेला लष्कराने केले रेस्क्यू, सात गावांचा संपर्क तुटला,लष्कर दाखल
पाथरी तालुक्यात गोदावरी नदीला पूर आला आहे यामुळे पाटोदा येथे गरोदर महिलेला लष्कराने मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास रेस्क्यू करत रुग्णालयात दाखल केले.या पुरामुळे पाटोदा सह लिंबा, वडी,निवळी, गोपेगाव, मरडसगाव,डाकूपिंप्री या गावांचा संपर्क तुटला असून या परिसरात लष्कर दाखल झाले आहे.