अमळनेर बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना महिलेच्या गळ्यातील २४ हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.