चंद्रपूर: स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी केला खा. धानोरकर यांचे उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाचा मार्ग आखणाऱ्या धोरणावर विश्वास ठेवत वरोरा शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी, माता-भगिनींनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. वरोरा येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या आनंदात संपन्न झाला. यावेळी श्रीमती आशाताई उमरे, श्रीमती प्रणिता बागेसर, श्रीमती आरती ढावणे, श्रीमती आशा पाटील, श्रीमती तारा कामटकर, श्रीमती प्रणाली सुसनकर, श्रीमती अफसाना शेख, श्रीमती सुवर्णा कामटकर, श्रीमती सत्यभामा थेटे, श्रीमती जोशना नक्षीने, श्रीमती मनीषा