माढा: शिवाजी महाराज चौकात भरदिवसा दुहेरी घरफोडी; दोन भावांच्या घरातून दीड लाखाचा ऐवज लंपास
Madha, Solapur | Sep 23, 2025 कुईवाडी येथील शिवाजी महाराज चौकात भरदिवसा दुहेरी घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी शेजारी राहणाऱ्या दोन भावांच्या घरातून जवळपास १० तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच २५ हजार रुपये रोख असा दीड लाखांचा ऐवज लंपास केला. घटनेची नोंद वीरेंद्र व रवींद्र भांबुरे यांनी पोलीस ठाण्यात केली असून सीसीटीव्ही फुटेज व ठसे यांच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.