देसाईगंज वडसा: देसाईगंज येथे तालुका स्तरीय महिला मेळावा संपन्न
एकात्मिक बाल विकास प्रकल्प देसाईगंज अंतर्गत तालुका स्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते पार पडले.या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार मसराम म्हणाले की, “महिला सबलीकरण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महिलांच्या सहभागाशिवाय समाजाचा खरा विकास शक्य नाही. असे त्यांनी सांगितले.