वाशिम: एस. टी. प्रवर्गात आरक्षण मिळवण्यासाठी गोर बंजाराने समृद्धी महामार्गावर भोग लावून केला दोन तास रास्ता रोको
Washim, Washim | Oct 30, 2025 गोर बंजारा समाजाला एस टी.दर्जाचे आरक्षण मिळावे, हैदराबाद गॅझेट लागू करुन सेवा सवलती उपलब्ध करून देण्यात याव्यात यामागणीसाठी गोर बंजारा महाराष्ट्रभरातून समृद्धी महामार्गावर उतरुन सतगरु सेवालाल अन् याडी मरियामाला भोग लावून जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन केले.पोहरागडचे महंत कबीरदास महाराज यांनी विंती आरदास बोलून प्रा संदेश चव्हाण,महंत संजय महाराज,जानू महाराज,प्रा डॉ अनिल राठोडसह हजारो गोर बंजारा आंदोलकांनी यात सहभाग घेतला.