धुळे: धुळे हादरलं! संतोषी माता चौक परिसरात अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ, धुळे शहर पोलीस ठाण्यात नोंद
Dhule, Dhule | Nov 10, 2025 धुळे शहरातील संतोषी माता चौक परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. नहार कॉम्प्लेक्सजवळ अंदाजे ४५ ते ५० वयोगटातील व्यक्ती चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आली. स्थानिकांच्या माहितीवरून पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पटवणे आणि मृत्यूचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.