दारव्हा: चिखली ते मानकोपरा मार्गावरील खड्ड्यांमूळे नागरिक त्रस्त, दुरुस्ती करण्याची मागणी
दारव्हा तालुक्यातील चिखली ते मानकोपरा दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर सर्वत्र खोल खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.