मालेगाव: मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल ए वन समोर दोन संशयित ताब्यात दहा लाखाच्या बनावट नोटा हस्तगत
मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल ए वन समोर संशयितरित्या जाणाऱ्या दोन जणांना मालेगाव तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा तसेच दोन मोबाईल हस्तगत केले असून या प्रकरणी नजीम आक्रम मोहम्मद अन्सारी राहणार बऱ्हाणपूर मध्य प्रदेश त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित तपास मालेगाव तालुका पोलीस करीत आहे