कळमनूरी: कळमनुरी शहरात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आदिवासींचा आरक्षण बचाव मोर्चा
कळमनुरी विधानसभेचे माजी आमदार डॉ .संतोष टार्फे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता दरम्यान आदिवासी बांधवांच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात येऊन शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता .यावेळी कळमनुरीचे तहसीलदार यांच्यामार्फत राज्य शासनाला निवेदन देऊन बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यात येऊ नये या संदर्भात मागणी करण्यात आली आहे .यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधवांची उपस्थिती होती .