शेजारी-शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होण्याच्या घटना अनेकदा समोर येतात. मात्र, वर्धा जिल्ह्यातील देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत वाबगाव येथे हा वाद चांगलाच अंगलट आला आहे. केवळ अंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली असून, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. असे आज 13 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे