बुलढाणा: फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी डॉक्टर संघटनांचा मूक मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर,आरोपींवर कठोर कार्रवाईची मागणी
फलटण येथे डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आहे.याप्रकरणी आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या संघटनांनी आंदोलन पुकारले आहे.आज 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील विविध डॉक्टर संघटनांनी बुलढाणा जिल्हा परिषदेतुन जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मूक मोर्चा काढला.यावेळी डॉक्टरांनी काळया फिती लावून या घटनेचा निषेध नोंदवत एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.