नातींना शाळेतून आणण्यासाठी मोटरसायकलवरून निघालेल्या बापूसाहेब विठ्ठल गाढे यांचा रस्ता अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवार दि. २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास राहुरी शहर हद्दीत घडली. बापूसाहेब गाढे हे सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता मोटरसायकलवरून नातींना शाळेतून आणण्यासाठी घरातून निघाले होते. मल्हारवाडी रोड परिसरात पाट्याजवळ असताना त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.