कारंजा: आंजी आणि अकोली रोडवर पोलिसांनी दोन दुचाकीसह देशी-विदेशी दारू असा जुमला किंमत एक लाख 79 हजार 842 रुपयाचा मुद्देमाल जप्त
खारांगणा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा आजी शिवारात दिनांक एक तारखेला दीड ते दोन वाजताच्या दरम्यान कार्यवाही करून पांढऱ्या रंगाची मोपेड आणि देशी दारू संत्रा कंपनीच्या शीशा असा जुमला किंमत एक लाख पंचवीस हजार चा मुद्देमाल जप्त केला तर दुसऱ्या घटनेत दिनांक एक तारखेला सव्वा बारा ते एकच्या दरम्यान अकोली रोडवर दुचाकी आणि विदेशी दारू असा 64 हजार 842 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी आज दिली आहे