समुद्रपूर: स्वातंत्र्य काळापासून तहानलेल्या केसलापार गावाची जल जीवनमुळे ७६ वर्षानंतर आमदार कुणावार यांच्या पुढाकाराने जलापूर्ती
७६ वर्षापासून दर वर्षी जसजशी उन्हाची तिव्रता वाढत जायची तस तसी केसलापार गावात नागरीकांची पाण्यासाठी भटकंती सुरू होत होती.यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने विहीर अधिग्रहण करून नागरीकांना बाहेरील वापरासाठी पाणी उपलब्ध करून देऊन जखमेवर मलम लावण्याचे काम सुरू होते.याठिकाणी पाण्यासाठी पाणी महिलांना गावाशेजारी शेतातील आणून कुटुंबाची तृष्णातृप्ती करावी लागत होते.अनेकांना बोर व कूपनलिकेचे पाणी पिवून तहान भागवावी लागत होते. या गंभीर समस्येची आमदार कुणावार यांनी दखल घेतली आणि आज पाणी सुरू झाले.