सावंतवाडी: "ओंकार" हत्तीची मुंबई-गोवा महामार्गावरील पत्रादेवी येथील सीमा तपासणी नाक्यानजीक हजेरी : बागायतीचे केले नुकसान
गेले चार दिवस नेतर्डे परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या "ओंकार" हत्तीने मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गावरील पत्रादेवी येथील सीमा तपासणी नाक्यानजीक हजेरी लावली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तत्पूर्वी रात्री हत्तीने फकीरफाटा येथील मराठी शाळेच्या आवारात बस्थान मांडत तेथील केळी बागायतीची नासधूस करत नुकसान केल. आज मंगळवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हा हत्ती गोव्याच्या दिशेने गेला.