धुळे: धुळ्यात पांझरेचे रौद्र रूप, सुरक्षेसाठी ब्रिटिश कालीन मोठा दगडी पूल वाहतुकीसाठी बंद, पोलीस बंदोबस्त तैनात
Dhule, Dhule | Sep 28, 2025 पांझरा नदीला आलेल्या पुराने धुळे शहरातील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन दगडी पूल तसेच कालिकामाता मंदिराजवळील फरची पूल सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. अक्कलपाडा धरणातून १८,००० क्युसेक विसर्ग व पावसामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासन हाय अलर्टवर असून, पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्राजवळ न जाण्याचे कठोर निर्देश देण्यात आले आहेत.