मारेगाव: यात्रा फिरण्यासाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीवर केला अत्याचार; मारेगाव येथील घटना
प्रसिद्ध पांढरदेवी यात्रेत मैत्रिणींसोबत आलेल्या व नंतर मैत्रिणींपासून भटकलेल्या एका मुलीवर जंगलात नेऊन अत्याचार करण्यात आला. ही धक्कादायक घटना बुधवारी दि. २२ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो व इतर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मारेगाव तालुक्यातील हेमाडपंथी पांढरदेवी मंदिर हे संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दिवाळीत गाई गोधनाच्या दिवशी मंदिरात मोठी यात्रा भरते. या ठिकाणी द्रवरून नागरिक यात्रे