कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी दुपारी खापरी मुंगापूर (ता. सेलू) येथे घडली. या प्रकरणी सेलू पोलिसांनी आरोपी जावया विरुद्ध रात्री ७.३० वाजता गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. जखमीचे नाव सुरेश शंकर देवतळे (वय ५३, रा. खापरी मुंगापूर) असे आहे. तर आरोपीचे नाव संदीप जगनराव उडान असे असून तोही त्याच गावातील रहिवासी आहे. त्याची ता. ८ ला दुपारी २.३० वाजता कारागृहात रवानगी करण्यात आली.