वर्धा: खोट्या प्रमाणपत्रावर काम मिळवणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई व्हायलाच हवी आमदार राजेश बकाने यांची मागणी
Wardha, Wardha | Sep 26, 2025 वर्धा ग्रामीण रस्त्यांचे काम फसवणूक करून मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला असून मे. नयन इंटरप्राईजेस, वर्धा यांनी खोटं प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केल्याचे जिल्हा परिषदेच्या चौकशीत उघड झाले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या लेखाशीर्ष 3054 व 5054 अंतर्गत ग्रामीण रस्ते विकासाकरिता 2024-25 मध्ये निधी उपलब्ध झाला होता. संबंधित निविदांमध्ये “हॉट मिक्स प्लांट सुस्थितीत असणे बंधनकारक” अशी