पुसद: उपविभागाच्या शहर, ग्रामीण विभाजनास महावितरणची मंजूरी
Pusad, Yavatmal | Sep 29, 2025 पुसद तालुका लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असून वाढत्या लोकसंख्येमुळे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे व ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्याचे महावितरण समोर आव्हान आहे. त्यामुळे पुसद उपविभागाचे विभाजन व्हावे अशी मागणी जनतेतून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. ती मगणी पूर्ण करण्यासाठी नागरिक सातत्याने राज्यमंत्री इंद्राणी नाईक यांच्याकडे पाठपुरावा करत होते. अखेर पुसद उपविभागाचे शहर व ग्रामीण असे दोन विभाजन करण्यात महावितरण कडून मंजुरी मिळाली आहे.