डहाणू गरपरिषद निवडणुकीत भाजप विरोधात शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत. यात शिवसेना ठाकरे पक्ष व माकप सोबत आल्यास, जे कोणी सोबत येतील त्यांचे स्वागतच आहे. एकत्र लढण्यास आम्ही तयार आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.