बिलखेडा गावाजवळील स्वप्निल हॉटेल जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने रामदेववाडी येथील मुकेश आबेसिंग राठोड वय २९ या तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घडली होती. याबाबत गुरूवारी ३० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.