वर्धा: आंजी मोठी गावात अतिवृष्टीग्रस्तांना 'खावटी' मदत: आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
Wardha, Wardha | Sep 15, 2025 वर्धा तालुक्यात येणाऱ्या आंजी मोठी गावात या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, अनेक घरांची पडझड झाली आहे.या परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने तातडीने मदत जाहीर केली आहे. बाधित कुटुंबांच्या घरांचे पंचनामे करून त्यांना 'खावटी' स्वरूपात प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला आहे. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आंजी मोठी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते हे धनादेश वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार आणि इतर सरकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते