नांदुरा: राष्ट्रीय महामार्गावर बुलढाणा बायपास जवळ कार व दुचाकीचा भीषण अपघात;दुचाकीस्वार जागीच ठार
राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा – मलकापूर दरम्यान बुलढाणा बायपास जवळ कार व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज २४ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घडली. यामधे दुचाकीस्वार हा जागीच ठार झाला. नारायण प्रल्हाद मानकर वय अंदाजे ६५ वर्ष असे मृतकाचे नाव असून मृतक हा खातखेड येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.