विक्रमगड: दोन ट्रक आणि दुचाकीचा खांडेश्वरी नाका परिसरात भीषण
दोन ट्रक आणि दुचाकीचा भीषण असा अपघात खांडेश्वरी नाका परिसरात घडला आहे. एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता ट्रकच्या काही अंतरावर दोन तरुण दुचाकी थांबवून यातील एक जण मोबाईलवर बोलत बसला होता. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या एका दुसऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली आणि ही दुचाकी उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. सुदैवाने दुचाकीजवळील दोनही तरुण वेळीच बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे