उदगीर शहरातील तीन प्रभागातील मतदान हे न्यायालयीन आदेशामुळे स्थगित करण्यात आले होते. येत्या २० डिसेंबर २०२५ रोजी या तीन प्रभागाचे मतदान होणार आहे. त्या अनुषगांने उदगीर नगर परिषदेच्या प्रभाग ८ अ, प्रभाग १५ ब , व प्रभाग १६ ब , मधील प्रत्येकी एका जागेसाठी नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासंदर्भात उदगीर येथील निवासस्थानी युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी घेत युतीच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले