कन्नड: नाचनवेलमध्ये मृत माकडाचा पाळीव जनावराप्रमाणे केला सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार
नाचनवेल येथील गिरजामाता नगर परिसरात रविवारी सायंकाळी माकडांचा धुमाकूळ सुरू असताना एका माकडाचा विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाला. ही घटना स्थानिक महिलांनी पाहून रावसाहेब शिंदे यांना कळवली. त्यांनी तत्काळ निसर्गमित्र देविदास थोरात यांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचताच थोरात यांनी गणेश शिंदे व रावसाहेब शिंदे यांच्या मदतीने त्या माकडाचा शेतकऱ्याप्रमाणे पाळीव प्राण्याचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केला.