कर्जाची परतफेड करण्यासाठी चक्क मयत शेतकऱ्याला लॊकअदालतीमध्ये हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली. आज दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी 2 च्या दरम्यान शिखाचीवाडी व वाडीतील अनेक शेतकऱ्यांना एसबीआय बँकेने थकीत कर्जासाठी लोकअदालताची नोटीस पाठवली आहे. धक्कादायक म्हणजे ज्यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले ते शेतकरी खंडू सटवाजी मेंढेवाड यांनाही 13 डिसेंबरला लोकअदालतात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आलनोटीस मुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी मुदखेड तहसीलसमोर खराब सोयाबीन टाकून याचा निषेध केला.