बापरे!मस्साजोग खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बॅनर व्हायरल
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात तुरुंगात असलेला वाल्मिक कराड या आरोपीच्या समर्थनार्थ एक बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.सोमवारी, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता हा बॅनर सोशल मीडियावर दिसला. या बॅनरमध्ये “वाल्मिक (अण्णा) कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी” तसेच “अण्णांचे नाव आणि चेहरा सोशल मीडियावर टिकून ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य द्या” असा मजकूर लिहिण्यात आला आहे.