जालना: पडल्यावरही अहंकार गेला नाही; खा. डॉ. कल्याण काळे यांची माजी आमदार गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता टीका
Jalna, Jalna | Oct 26, 2025 जनतेने मला निवडून दिलं आहे, मी स्वतः निवडून आलेलो नाही. जालना जिल्ह्यातील नागरिकांनी लोकशाहीचा कौल दिला आहे. पण तो निर्णय चुकीचा झाला असं म्हणणं म्हणजे मतदारांचा अपमान आहे, अशा शब्दांत खासदार डॉ. कल्याण काळे यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. पडल्यावरही तुमचा अहंकार गेला नाही, असा टोला त्यांनी लगावला. रविवार दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता जालना येथील गुरु गणेश भवन येथे आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात खासदार डॉ. काळे बोलत होते.